मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त चर्चा उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेल्या फोटोची!

Foto
मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. ट्विट करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा खास फोटोही शेअर केला असून, याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांनी शुभेच्छा देताना बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनातील फोटो ट्विट केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे बसलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागील दोन दिवस सामनात मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यावेळी एका प्रश्‍नाच्या उत्तरात राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्या हाती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.  दोघे (राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस) मागे बसलेले आहेत. अजित पवारांनी शुभेच्छा देताना ट्विट केलेल्या फोटोचा या विधानाशी सोशल मीडियावर संबंध लावला जात आहे. या फोटोत उद्धव ठाकरे आणि अजित पवार गाडीत बसलेले असून, स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती आहे. त्यामुळे हा फोटो आता चर्चेचा विषय झाला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker